STORYMIRROR

kishor zote

Comedy

4  

kishor zote

Comedy

ती ( हास्य काव्य )

ती ( हास्य काव्य )

1 min
28.6K



कॉलेजची बात निराळी होती

नोटबुक फक्त हातात ती होती


वर्षभर धिंगाणा मौज मस्ती

तारीख आता आली परीक्षेची


ती नेहमीच माझी वाट पाहत होती

माझी तीच्याकडे नजर गेली नव्हती


कॉलेज पासून दूर ती उभी होती

शांत एकाकी अन् एकटीच होती


दोघांची अशी नजरानजर झाली

पाहताच पाऊले तीकडे वळाली


जवळ जाताच तीही मग हसली

आज होणार तीचा जणू तीला खात्री


मग तीने मला व मी तीला साथ दिली

सोबतीत तीच्या संध्याकाळ ही झाली


मित्रांनो ती दुसरी तीसरी कोणी नव्हती

ती तर माझ्या कॉलेजची लायब्ररी होती


ती तर माझ्या कॉलेजची लायब्ररी होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy