We welcome you to write a short hostel story and win prizes of up to Rs 41,000. Click here!
We welcome you to write a short hostel story and win prizes of up to Rs 41,000. Click here!

Pooja Pate

Comedy Abstract Others


1.9  

Pooja Pate

Comedy Abstract Others


पुणेरी पाट्या

पुणेरी पाट्या

1 min 14.2K 1 min 14.2K

या अशा पुणेरी पाट्या

खोचक पण रोचक असती

ही वेगळीच रे दुनिया

हे चोखंदळ जन असती

उपदेश आणखी सल्ले

यांना ना कमीच काही

हा अनुभव घेण्यासाठी

त्या पेठा फिरून पाही

ते दगड सुध्दा ओळखती

हा मुळचा अन तो परका

का डोके खराब करतो

चल मार कढीचा भुरका

नाहीच कुणाला जमली

या जगात त्यांची नक्कल

ते रोज लढविती न्यारी

एकेकच भलती शक्कल

ही पुणेकरांची वस्त्रे

त्यांनाच शोभती बाबा

तु केली जरी परिधान

आणशील कोठुनि गाभा?

हा विषयच व्यापक मोठा

याच्यावर होईल ग्रंथ

ही जीवनशैली भिन्न

हा वेगळाच रे पंथ !

 


Rate this content
Log in

More marathi poem from Pooja Pate

Similar marathi poem from Comedy