Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pooja Pate

Others

3  

Pooja Pate

Others

' वैज्ञानिक संत'

' वैज्ञानिक संत'

1 min
8.1K


दिसले तयाला । पडणारे फळ ।

मेंदूतून कळ । गेली गेली ।।

खालीच का येते । वस्तू पडणारी ।

बाब घडणारी । नित्याचीच ।।

काढली तयाने । जागोनिया रात्र ।

पक्का शोध मात्र । लावीयेला ।।

दाविले जगाला । नियम गतीचे ।

न्यूटन मतीचे । अविष्कार ।।

 भविष्य दिसले ।न्युटोबा तुलाही ।

 बुद्धीचा झुलाही । झेपावला ।।

लिहावे वाटले । तुझ्यावर काही ।

निरखोनी पाही । रसिका तू ।।

वंदितो मुरारी । विज्ञानाचे संत ।

ज्ञानी जे महंत । अजरामर ।।


Rate this content
Log in