Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pooja Pate

Others

3  

Pooja Pate

Others

' मी मला माझे इत्यादी ...."

' मी मला माझे इत्यादी ...."

1 min
13.3K


नवा विचार आला आहे , एकटं एकटं जगणं

आपल्या आपल्या डोळ्यांनी , आपलंच आभाळ बघणं

मुंडावळ्याही नकोत आणि , नकोत सात फेरे

कळप म्हणतो मेंढराला , आमच्या मागे ये रे

कामापुरती नाती ठेवू , तात्पुरती नि वरवर

जुना होताच रेडीओही , हमखास करतो खरखर

करियरच्या मागे धावू , त्याला नको धक्का

त्याचा आणि तीचासुद्धा निश्चय आता पक्का

मोठ्या मोठ्या शहरांमध्ये , पसरले हे लोण

'एकेला चलो'मोहीम आता , थांबवणारंय कोण

आधीच झालीत लॉजिंग बोर्डींग कितीतरी घरे

प्रेमाशिवाय भिंतींना त्या शोभा काय बरे

मनाची रे भूक कधी , धन शकेल भागवू ?

तसे असता म्हणतील सारे , रोजच पार्सल मागवू !!


Rate this content
Log in