STORYMIRROR

Pooja Pate

Others

3  

Pooja Pate

Others

"विकास?'

"विकास?'

1 min
13.6K


सुख दाराशी आणणारी

साधनं झाली खूप

तरीसुद्धा आनंदाचं

कुठे हरवलं रूप ?

हव्यासाने गाठली जेव्हा

उच्च पातळी अती

दुसरं काय होणार मग

अती तिथं माती

विकास नको करणारा

माणुसकीला पारखा

मुलांच्याही भेटीसाठी

मायने मागायच्या तारखा.


Rate this content
Log in