STORYMIRROR

Aruna Garje

Comedy

4  

Aruna Garje

Comedy

सोन्याची नोकरी

सोन्याची नोकरी

1 min
321

किती आनंद आनंद झाला आज

आमच्या सोन्याला नोकरी लागली आज


कुणी तरी पेढे आणा गं

सोन्याला माझ्या भरवा गं

त्याच्या नोकरीची नोकरीची

लागली होती आस

    आमच्या सोन्याला... 


'फॉर्मल' कपडे आणा गं

सामानाचं 'पॅकिंग' करा गं

दोन चाकाची चाकाची

'सुटकेस' आणा आज 

    आमच्या सोन्याला...


सोन्याचं पाहून रुपडं गं

आनंदा आलं माझ्या भरतं गं

मीठ मोहऱ्यांनी मोहऱ्यांनी

नजर काढा आज 

   आमच्या सोन्याला... 


सोन्या जाई मुंबई बेंगलोरला 

कधी तरी येईल 'वीकेंड' ला

एका वर्षाच्या आतच त्याच्या 

लग्नाचा उडवू बार

    आमच्या सोन्याला... 


सोन्या काय म्हणतो - 


अजून तर मी गेलोच नाही 

अन् तुमचे 'प्लान्स' तयार

माझी मला थोडीशी 

'लाईफ' जगू द्या यार

    थोडीशी 'लाईफ' जगू द्या यार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy