धोक्याचे वय
धोक्याचे वय
ती -- म्हातारपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याच ,
पन्नासाव वरीस धोक्याच गं
कोरस -- पन्नासाव वरीस धोक्याच गं || धृ ||
ती -- सुसाट वेग आजाराचा , ठोका चुकवी ह्रदयाचा
तोल सुटावा अशी वेळ ही , चालणे ठेवा नेमाचं
कोरस -- तोल सुटावा अशी वेळ ही , चालणे ठेवा नेमाचं || १ ||
ती -- रात्र नकोशी झाली गं , झोपही मजला मुकली गं
टीकटीक, टीकटीक घड्याळाची , मला नकोशी झाली गं
कोरस -- टीकटीक टीकटीक घड्याळाची , मला नकोशी झाली गं || २ ||
ती -- लागे, रक्तदाबाची चाहूल गं , घेतला डायबेटीसचा धसका गं
आज मला हे गुपित कळल , महत्त्व योगाभ्यासाच गं
कोरस -- आज मला हे गुपित कळल , महत्त्व योगाभ्यासाच गं || ३ ||