काय बाई सांगू
काय बाई सांगू
काय बाई सागूं
कसं गं सांगू..
मोबाईलचा लागलायं
भलताचं नाद
नवऱ्याशी घालते
मी त्यासाठी वाद
दिवसभर चालते
मैत्रिणींशी चॅटिंग
ऑनलाईन चालते
आमची मिटिंग
जेवायला सुध्दा
वेळ मिळत नाही
काम माझे सारे
राहून जाई
सासूशी घालते मी
त्यासाठी वाद
मोबाईलचा लागलायं
भलताचं नाद
काय बाई सांगू
कसं गं सागू....
एक तरी सेल्फी
रोज काढते
मैत्रिणीला ती
पटकन धाडते
मग येतो रिप्लाय
छान छान!
गर्वाने ताठ होते माझी मान
काय बाई सांगू
कसं गं सांगू..
फेसबुक अपडेट
रोज रोज करते
दिनचर्या माझी
यातचं सरते
नेटवर अकाऊट माझे
सतराशे- साठ
सतत पाहते मेसेजची वाट
काय बाई सांगू
कसं गं सागूं
गुड- माँर्निग, गुड नाईट
रोज मी म्हणते
आता मी स्वतःला
आधुनिक गणते
ऑनलाईन शॉपिंगची घेते मजा
बँक बॅलंस होतोय वजा
काय बाई सांगू
कस गं सागूं..
पिज्जा,बर्गर ऑडर करते
असेच माझे पोट भरते
बाहेरचं खायचा लागलायं नाद
मोबाईलसाठी घालते मी
सर्वांशी वाद
काय बाई सांगू
कसं गं सांगू
मोबाईलचा लागलायं
भलताचं नाद
