दोन बायका फजिती ऐका
दोन बायका फजिती ऐका
झाले नाही मूलबाळ पहिल्या बायकोला
करुनी आणली घरातल्यांनी दुसरीला
काय सांगू मी माझा किस्सा
मुकलो मी घरातल्या ह्या शांतीला
दोन बायका फजिती ऐका
दैना झाली माझ्या संसाराची
पहिली म्हणते लुगडेच आणा
दुसरी बोले मी नाही का लाडाची?
दोन्ही बनवती सुग्रास जेवण
आग्रहाने मज जेवू घालती
कोणा ना पडली माझ्या पोटाची
पोट दुखीने जीव होई वरखालती
झाली कितीक उधारी दोघीपायी
खर्च कमाईचा मेळ बसतच नाही
उधारी घेऊन जगणे झाले कठीण
तोंड लपवावे अशी जागा उरतच नाही
भांडणाची माझ्या घरात स्पर्धाच असते सुरू
सारखी धुसफुस कटकटीने चिंता माझी वाढली
कुठून सुचली दुर्बुद्धी केली जीवनाची दुर्दशा
आजार लागले पाठीमागे शुगर माझी वाढली
