STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy Others

4  

Jyoti gosavi

Comedy Others

सौ चा नववर्षाचा संकल्प

सौ चा नववर्षाचा संकल्प

1 min
354

नववर्षाचा संकल्प 

आमच्या सौ ने केला

उद्यापासून जायचे

 उठून सकाळी जॉगिंगला

 असं कसं जायचं 

जॉगिंगला सूट पाहिजे

 चप्पल चालत नाही म्हणे

 स्पोर्ट चे बूट पाहिजे

 तीन हजाराची बसली

 खिशाला चाट

  सौ आमची तुडवू लागली

म्युन्सिपाल्टी ची वाट

पण हाय रे दुर्दैवा 

रस्त्यात आला खड्डा

हॉस्पिटलचे बिल भरताना

 माझ्या पोटात खड्डा

डॉक्टरांचे बिल 

झाले पाच हजार

सौ च्या जॉगिंग ने

 मी  मात्र बेजार


मग आमच्या सौ ने

 बैठ्या व्यायामाचा विचार केला

 कोणत्यातरी बाबाचा

 योगा क्लास लावला

 तिथेही एक दिवस 

पाठीत भरली उसण 

सौ ला भारी पडले

 बाबांचे योगासन

मग पुन्हा डॉक्टर 

औषधे शेक आणि लेप 

सौ च्या व्यायामातून

 मी धडा शिकलो एक


एक दिवस पहाटे उठलो

 केला सकाळचा चहा

अग मी काय म्हणतोय

 जरा इकडे तरी पहा

तूच माझी ऐश्वर्या

 तुझी बिपाशाची नजर

अजूनही तुझी 

रेखा सारखी फिगर 

तुझी एक नजर अजून

 करते घायाळ जिगर

 मग तुला व्यायामाची काय गरज 


लोक हो ही मात्रा मात्र

 छान लागू पडली 

सौ ची व्यायामाची 

आणि माझी डॉक्टरचे

 बिल भरण्याची कटकट

 एकदमच मिटली 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy