चोरी बरी नाई
चोरी बरी नाई
एक होता चोर
चोरी त्याची थोर
बघून घरात कोणीच न्हाय
हळूच घातला घरात पाय.......
शोधू लागला पैसे
हिरे अलंकार रत्न ही कैसे
शोधल त्यानं सर्व घर....
पण नाही दिसलं कवडी भर.......
थकून गेला बेचारा
हाल झाले तरातरा
डोक्याचा झाला भुसा...
मारतोय स्वतः उठ-बसा........
शेवटी दुखू लागलं डोकं
सापडत नाही एकही पैशाच खोक
आता डोक्यासाठी कशीबशी
पळवली झेंडू बाम ची शिशी........
बायको जवळ गेला घरी
म्हणाला कमाई नाही बरी
बायको त्याच्यावर रुसली
येऊन त्याच्या समोर बसली
म्हणाली,
"आता चोरी बरी न्हाई
उद्या वांदे होतील माये"
बायकोच पाहून प्रेम
त्याचा मनात एकच नेम......
बायकोसाठी करू कमाई
पण,
आता चोरी कराची नाई
आता चोरी कराची नाई.
