STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Romance

3  

Gaurav Daware

Abstract Drama Romance

मीच का....

मीच का....

1 min
230

तुझ्यात माझ्यात असं काय साम्य असावं

का माझं मन पुन्हा तुझ्याकडेच झुकावं

तुझ्यातला गोडवा मी पुन्हा का पाहावा 

माझ्यातल हसू तुझ्यातच का दिसावं 


तुझ वाईट वागण मला का आवडाव

तुझं असं रुसणं मीच का सहाव

तुझ्यापुढे माझं मन कितीदा हरावं

मनात माझ्या नेहमी तूच का शिराव


तूझ्या प्रत्येक गोष्टीत मीच का असावं

तूझ्या प्रत्येक आनंदात मीच का सजाव

माझं हृदय का पुन्हा तुझ्यापुढेच झुकावं

का तुझ्यातलं हसणं मी माझ्यातच पाहावं


माझ्या अबोल शब्दांना मीच का समजावं

माझ्या वाईट वागण्याला मीच का पाहावं

तूझ्या प्रत्येक गोष्टींना मी मात्र हसावं

 तुझं असं वागण माझ्यापुढे कधीपर्यंत टिकावं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract