STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Romance

3  

Gaurav Daware

Abstract Drama Romance

मला भेटलेली ती...

मला भेटलेली ती...

1 min
141

नात्याच्या अनमोल रत्नांनी माखलेली 

सुंदर परी ती जणू रूपाने सजलेली

 भव्य अशा अफाट श्रीमंतीत नटलेली

 होती फार गोड ती आज मला भेटलेली


 आयुष्याला जिने स्वप्नांनी वेढलेली

 न म्हणता ही तीच पुन्हा आवडलेली

 मनाला नाही पण हृदयाला पटलेली

 होती फार गोड ती आज मला भेटलेली


 हातावरच्या रेषा नकळत उमटलेली

 डोळ्याच्या पाण्यात उगाच सजलेली

 ओठांवरच्या गोडीत नकळत गुंतलेली

 होती फार गोड ती आज मला भेटलेली


 अबोल शब्दांनाही हुशारीने भिडलेली

 मायेला ओंजळून रडत जन्मलेली

 निसर्गाने तिला माझ्यासाठीच निवडलेली

 होती फार गोड ती आज मला भेटलेली.


 आदर आचरणात घेऊन पुन्हा सजलेली

 स्वप्नांना नाही तर वास्तव्याशी भिडलेली

 बोलक्या शब्दांसमोर अबोलीत नटलेली

 होती फार गोड ती आज मला भेटलेली 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract