STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Romance Others

3  

Gaurav Daware

Drama Romance Others

मनात तु

मनात तु

1 min
143

आयुष्याच्या वळणावर भेटतं का ग असं कोणी 

तू भेटली अशी जणू अनोळखी माझी वाणी 

कितीदा बनवू मी तुला मनाच्या राजाची राणी 

राणी बनते तू पण तूझ्या मी नसतो ध्यानी 


तुझ्या संगे स्वप्न मी गायली भरपूर गाणी 

कधी आठवणीत बनलो स्वतः चक्रपाणी 

कधी होत असे तू माझ्या मनाची इंद्राणी 

तर कधी फक्त माझ्या हृदयाची वाणी 


आठवणीत शोधतो तुला कधीही अनवानी 

कधी असतो गाभाऱ्यात तर कधी ठिकठिकाणी 

कधी बनतो लेखक कधी तर कधी मात्र अडाणी 

कधी असतो स्वतंत्र तर कधी जीवाची आणीबाणी 


उकडलेल्या आयुष्यात तुझी आठवण राहावी ध्यानी

म्हणून करतो प्रयोग गाऊन थोडी अभंगवाणी 

थोडं भविष्यात जाऊन विचारांना घालतो खतपाणी 

पण आता फक्त तु उरली माझ्या आयुष्याची कहाणी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama