STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Action Classics

3  

Gaurav Daware

Drama Action Classics

ओळींची गोष्ट

ओळींची गोष्ट

1 min
135

रानात राहणाऱ्या परीलाही

माहिती नसते पूर्ण गोष्ट

जवळच असलेल्या समुद्रच्याही

बाबी असतात पूर्ण स्पष्ट


स्वतःत हरवलेल्या मनालाही

स्वतःचे विचार वाटतात भ्रष्ट

अबोल ओठांवर येणाऱ्या गोष्टीही

काही लोकांना वाटतात कष्ट


जगात दिसणाऱ्या प्रत्येक प्रेमातही

अनोळखी व्यक्ती असतो अस्पष्ट

थोड्या वेळात भरपूर मिळणाराही

नेहमी स्वतःसाठी असतो असंतुष्ट


कविता लिहिणारा प्रत्येक कवीही

ओळींशी कधीकाळी होतो घनिष्ठ 

न रचनाऱ्या ओळींना सजवूनी

तो स्वतःला नेहमी मानतो गर्विष्ट


चुकलेल्या बाबी पुन्हा रचूनी

सिद्ध स्वतःला करतो कनिष्ट

अबोल ओळींना पुन्हा जपूनी

लेखक स्वतःची सांगतोय गोष्ट.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama