STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Others

3  

Gaurav Daware

Abstract Drama Others

ती कविता...

ती कविता...

1 min
196

आयुष्याच्या वळणावर लपलेली असते कविता

 वाक्य पडतात छोटे न शब्द कोणते सुचतात

 रडक असतं मन आणि रडकी असते संयोगिता

 हृदयात तुटलेल्या शब्दांचीच तयार होते कविता


 शब्द लिहिताना कधीकाळी जागी होते अस्मिता

 कधी सजतात शब्द तर कधी होते त्यांची चिता

 कधी वाक्य बोलतात तर कधी गाते ती सरिता

 अबोल शब्दांचेही पैजन करतात फक्त कविता


 गोड शब्दही येतात कधी काळी फक्त चर्चेकरिता

 कधी सजतात स्वतःसाठी तर कधी लोकांकरिता

 कधीकाळी वाहतात मंद तर कधी जणू प्राणहिता

 अशाच गोड शब्दांची रचना करतात कविता


 कधी असतो आकार तर कधी फक्त निवेदिता

 धीर देणाऱ्या शब्दांचा प्रकार बनतो तेजस्विता

 प्रत्येक काळात सजते प्रत्येक ओळींची अस्मिता 

 शब्दाचे उंबरठ्यावर उलटलेली असते ती कविता 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract