STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Others

3  

Gaurav Daware

Abstract Drama Others

कुटुंबाचा आधार

कुटुंबाचा आधार

1 min
189

कुटुंबाचा आधार असतो खरच भारी 

छोट्याश्या आयुष्याचा व्यक्ती अधिकारी 

सुखं दुःख तराजूत तोलतो तो सारी 

बनवतो आयुष्य तो खरा गुणकारी 


कुटुंबासोबत तो बनतो समविचारी 

थोड्याशा आयुष्यात दुःखाचा तो शिकारी 

आयुष्यात असतात दुःख ना पूर्ण टिकणारी 

तरीही कुटुंबाचा आधार असतो खरच भारी 


कुटुंबात जरी असले सहलोक चारी 

तरी असते एकमेकांना सर्व समजणारी 

थोडे असतात कुटुंबाचे खरेखूर पुढारी 

थोडे असतात आयुष्याची शिस्त वाटणारी 


थोडे असतात कुटुंबाचा आधार घडवणारी 

काही असतात कुटुंबाला बोलक बनवणारी 

काही असतात स्वतःचे विचार विकणारी 

तर काही असतात कुटुंबाचे मन जिंकणारी 


नाते असतात इथे पूर्ण आयुष्य जपणारी 

काही असतात कठोर तर काही मानणारी 

काही असतात घट्ट तर काही तुटणारी 

काही असतात प्रेमळ तर काही लढणारी 


म्हणून कुटुंबाचा आधार असतो खरच भारी 

थोड्याशा आयुष्याचा व्यक्ती बनतो अधिकारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract