स्मार्ट सूनबाई
स्मार्ट सूनबाई
काय करू बाई मी
संसारासाठी झिजले
स्वतःसाठी नाही पण
यांच्यासाठी जगले
चालले होते बाजारात
साडी होती हजारात
पण शर्ट होता फ्री
यांच्यासाठी बाई मी
दिली मनाची कुर्बानी
चेहरा आरशात पाहिला
किती होता सुकलेला
इच्छा नाही तरी पण
पार्लर मध्ये गेले पटकन
यांना छान दिसण्यासाठी
दोन हजार घातले मी
पार्सल जरा मागवता का...?
आज फारच दमले मी
वाढदिवस नवऱ्याचा
विसरून कसं चालणार
मग पार्टी केली छान
यांच्यावरच माझं ध्यान
किती बाई करतात काम
करते थोडे गुलाबजाम
दुसरं काही नाही हो
थकवा थोडा जाई हो
दिवाळसन आला बाई
माझी तर इच्छाच नाही
आल आमंत्रण पाहुण्यांचं
जुन्या कपड्यावर कसं जायचं...?
माझं काय मेलीचं...पण...
तोंड नाही पहावत तुमचं
असं कसं आपण जायचं
काय म्हणतील मला लोक...?
सूट घ्यायची केली घाई
किती छान दिसता बाई
नजर माझी लागू नाही
आता काय करू बाई
आपण दोघं मॅचिंग नाही
यांच्यासाठी बाई मी
बळच पैठणी काढली
फक्त उंची तेवढी नडली
झाला पाहुणचार छान
घराकडं लागलं ध्यान
विसरून नाही चालत भान
त्यांच्यावरच माझं ध्यान
जायचं होतं माहेरी
नाही जात यांच्यासाठी
देते आमंत्रण त्यांना घरी
राहतील चार दिवस तरी
आई म्हणे जावई छान
किती देतात बाई मान
पहा, अशी माझी आई
कौतुकाची तुमच्या घाई
हसले हे खुदकन
सोफ्यावर बसले मटकन
किती करतेस माझ्यासाठी...?
आजचं जेवण हॉटेलमधी
आता तुम्हीच सांगा खरं
इतकं सोपं आहे का ते
अहो स्मार्ट सूनबाई होणं
काय करू बाई मी
संसारासाठी झिजले
स्वतःसाठी नाही पण
यांच्यासाठी जगले
फक्त त्यांच्यासाठीच जगले
