वजन
वजन
आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व उठून दिसावे
आपण स्लिम अँड फिट असावे
वाटतेच सगळ्यांना...फास्ट अन् जंग फुड पुढे
कुठे आवरता येई हो स्वतःला
कंट्रोल युवर सेल्फ म्हणत
वाढता, वाढता, वाढते
चरबीचे शरीरावर थरावर थर
बसणे उठणे कधी कधी कठीण होते.. तुडुंब लठ्ठपणाचा केवढा हो कहर 😔
वडापाव पिझ्झा बर्गर मैदा बेसन चमचमीत पदार्थ 🍔🥪🍕
मिठाई खात घेतली जाते... एसीची हवा...सोबत थोडाफार आराम ही प्रत्येकालाच हवा
जिभेला ही हवा असतो चाखण्यास पदार्थ नवा😋
हाच तर ठरतो वजन वाढायला दुवा
मनाला तर नेहमीच वाटत..काहीतरी चमचमीत खाव....मग कितीदा
वजन वाढलेलं बघून
जिमला, फिरायला आता तरी जावं...
रोज ठरवलं तरी काही जमत नाही...कधीकाळी जात असल्यामुळे वजन काही कमी होत नाही...
निरोगी आरोग्यासाठी व्यायामशिवाय पयार्य नाही....
स्लिम आणि फिट माणसांकडे बघितले की मग
कधीकधी वाटतो हेवा ...
वजन कमी करण्यासाठी
कुणी ना कुणी सांगत असतं यावर उपाय नवा...
तिच वाटते मग दवा....
मन म्हणत मदतीला तूच धाव की रे देवा... नाहीतर
टिंगल करण्यास मिळतोच सर्वांना विषय हा नवा....
तसं सांगायचं झालं तर .....
वजन तो हमारी इच्छाओका है
बाकी जिंदगी तो बिल्कुल हलकीफुलकी है....🤗नाही का....😊🙏
