STORYMIRROR

Rajendra Udare

Comedy Others

3  

Rajendra Udare

Comedy Others

सासुरवाडीची प्रतिज्ञा

सासुरवाडीची प्रतिज्ञा

1 min
297

सासुरवाडी माझा

छोटासा असा देश आहे

अर्धेगाव माझ्या

सासऱ्याचे भावकीचे आहे .


माझ्या सासुरवाडीवर

माझे मनापासून प्रेम आहे .

माझ्या सासुरवाडीतल्या

गाड्या - घोडया अणं 

बंगल्याचा मला अभिमान आहे .

त्यांच्या संपत्तीत ' घरजावई '

म्हणून राहण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून

मी सदैव प्रयत्न करीन .


मी माझ्या सासऱ्यांचा ,            

सासुबाईंचा आणि त्यांच्या

भावकीच्या माणसांचा मान

ठेवीन आणि मेव्हणा , मेव्हुणीशी

प्रेमाने वागेन .


माझ्या सासऱ्यांच्या स्थावर व

जंगम मालमत्ता यांच्याशी मी

निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा

करीत आहे . त्यांचे सहकार्याने

माझे आणि कुंटूबाचे कल्याण

कसे होईल यातच माझा "स्वार्थ"

सामावला आहे .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy