STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

रंग उधळू जिवनीजाऊ त्यात रंगून

रंग उधळू जिवनीजाऊ त्यात रंगून

1 min
295

पांढरा म्हणे शुद्ध चित्त ठेवा

काळा सांगे सामावून घ्यावा


पिवळा सुर्योदया सम झळका

निळा समानता शिकवी बरं का


हिरवा नित्य बहरतच जगावं

लाल धोक्याकडे लक्ष ठेवावं


गुलाबी प्रेमाला साथ देतसे

पोपटी लोभस गोडंस दिसे


जांभळा दोन रंगाची मैत्रीच

विटकरी सर्वांस साथ भारीच


आकाशी उंचच भरारी घ्यावी

बदामी गोडीने वागाया लावी


बारा मासा सम हे रंग होय

होळीचं हे निमित्त असतय


रंगीबेरंगी आयुष्य असे महान

जगावे आणि जगू दयावे छान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational