STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

बोल अनुभवाचे (चारोळी)

बोल अनुभवाचे (चारोळी)

1 min
219

मुलगा मुलीत भेदभाव केला नाही

शिक्षण मनुष्याचा तिसरा डोळा

पोटास चिमटा शिकवले मुलांना

उच्चशिक्षण दिले पै पै करुन गोळा

............................


आर्थिक परिस्थिती जराशी ढासळली

काही भक्कम उभी होती देवरूपानं

जाणीवपूर्वक टाळले अनेकांनी

वेळ निभावली घरच्यांचे हिंमतीनं

............................


श्रध्दाळू आहे पण डोळसपणे

अंधश्रध्देस नाहीच देत भारा

माणसात देव पाहतो आम्ही

अन् माणुसकी हाच धर्म खरा

.............................


तहानलेल्यास पाणी दयावं

भुकेल्यांना दोन घास अन्न

परोपकारा देह झिजवावा

मन नेहमीच ठेवावं प्रसन्न


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational