STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

कोरोनाबरोबर जगायला शिकू या

कोरोनाबरोबर जगायला शिकू या

1 min
183

जोमाने पुन्हा गरुडझेप नभी घेवू

आपण लढू विक्राळ कोरोना हरवू


सकस अहार व नियमीत व्यायाम

व्यसनाला घालूयात पुरता लगाम


यंत्रणांचे ताण कमी करायला हवे

सगळयांनीच आत्मचिंतन करावे


मला घराबाहेर जाणं गरजेच का ?

मी मुखपट्टी ( मास्क ) बांधली का


सॅनिटायझर अन् साबणाचा वापर

वीस सेकंद मी स्वच्छ हात धुणार 


सामाजिक अंतर ठेवलं पाहिजेच

अटीशर्तीचे पालन करणे गरजेचं


हस्तांदोलन नको जोडू दोन्ही हात

स्पर्श नकोच कशाला दूर राहूयात            


प्रतिज्ञा करू या गर्दीत न जाण्याची

काळजी वाहू स्वत ;ची दुसऱ्याची


पुर्वी सारखे स्नेह संबंध टिकावेत

नव्याने आयुष्य सुखाने जगुयात


जे भोगलयं जगाने ते आठवू या

आता कोरोनाबरोबर जगायला शिकू या ...


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Inspirational