STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational

3  

Rajendra Udare

Inspirational

कोण म्हणतं?

कोण म्हणतं?

1 min
139

कोण म्हणतं ?

जगात काही खरं उरलं नाही


वायाला चाललीयं तरूण पिढी            

व्यसनाधीन झाली म्हणत राही

सगळीच नाही काहींना सुपारीचे

खांड कसं अजून माहीत नाही


आई बापाला मुलं न सांभाळी

वृध्दाश्रमामध्ये सोडूनच देती 

सगळीच नाही काही दोनघास

सुध्दा सोडून कधीही न जेवती


लबाडाचं जगं विश्वासच संपला

फसवाफसवी म्हणून बोंबा मारी 

सगळीच नाही काही शब्दांवरती

लाखोंची कामं होती अनुभव भारी


कोण कोणाचं नाही माणुसकी

संपली डांगणवाडा करू पाहे

सगळीच नाही कोरोना संकटात

माणुसकीचे दर्शन घडवले आहे


मिडीयाचे बोगस बातम्या देतात

खरं काहीही नसतं गैरसमज करी 

सगळीच नाही सत्य दाखवणारेही

विश्वासार्हाय चँनलचे कामे लयभारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational