STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Comedy Fantasy

3  

Trupti Thorat- Kalse

Comedy Fantasy

व्हॅलेंटाईन डेचा बेत फसला....

व्हॅलेंटाईन डेचा बेत फसला....

1 min
197

त्याला ना मुलींना गंडवण्याचं न्याराच छंद

नेहमीच पैजा लावण्यात तो असायचा दंग

गावात त्याला सगळेच म्हणे गोपिकांचा श्रीरंग


कित्येकींना त्यानं फिरवलं,कित्येकींना फसवलं

पण ह्या वेळी म्हणे तो तिच्याबाबतीत सिरीयस होता.

तिला पाहता तो सार भान हरपून बसला

तिच्यासाठी तो पूर्णपणे बदलला.


गावातल्याच काय टीव्ही मधल्या मुलींकडे पण डुंकून बघेना

चांडाळ चौकीत कायम तो रमणारा,आई-बापाला शेतीत मदत करू लागला.


ठरवून मनाशी पक्का इरादा, धरला तिच्या घराचा रस्ता

धाडस करून तिला म्हणाला आय लव्ह यू....


ती गोड हसली, त्याला वाटली पोरगी पटली

उद्या भेटू सांदच्याला पांदिला

चिंचच्या झाडा खाली असा बेत ही ठरला

गडी मात्र जाम खुश झाला.


तो पोहचला ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी

त्याच्याआधीच पोहचली होती, त्याची स्वप्नातली राणी;मनात तो खूप खुश होता.


आज योगायोगानं व्हॅलेंटाईन डे होता

त्यानं काढली मस्त ताजी लाल गुलाबाची फुलं

ती म्हणाली पहा गावकरी जिंकले की नाही मी पैज...!


फसलं की नाही अलगद हे खूळ

तसा चिंचेच्या झाडावरून गावाकऱ्यांचा कळप उतरला आणि आमच्या मजनूचा व्हॅलेंटाईन डेचा बेत फसला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy