पावसातील गमती
पावसातील गमती
धो धो पावसासोबत
मी खूप मोठी गट्टी
आकाशात काळे बादल पाहून
मी शाळेला मारयचो सुट्टी
वाहत्या पाण्यात तरंगायची
माझी कागदी नाव
आज तुझं पडणं नको थांबवू
हे देवा मला पाव
पावसाच्या सरी,मातीचा चिखल
फदक्या उड्या नाचो छमछम
थंडी भरली म्हणून
बिडी चा लपून मारत होतो दम
नदी नाल्याला पूर
त्यात मासोळ्यांची चढण
चिकण बोटऱ्या,काटवा
काटा मारे पटकन
आकाशात विज चमकता
भुई,डुंबर छाती पाहू
जंगलात आनंद वाटे
पक्ष्यांची आवाज येई कुहू कुहू
पावसाळ्यातील दिवस
खूप असे गंमतीचे
मनापासून आनंद लुटला
असे दिवस पुन्हा पुन्हा यावं मस्तीचे
