एप्रिल फूल!
एप्रिल फूल!
एप्रिल फूल म्हणजे नेमकं काय ,
हा तर केवळ , शब्दांचा खेळ |
ओठात आगळं , पोटात वेगळं ,
कळण्याआधीच , निघून जाते वेळ |
चालता बोलता , वाटते जवळची ,
आभास म्हणा , अथवा मृगजळ |
असो , तुम्ही बोलून तर बघा राव ,
वेळ तिची , नी तुमचं बळ |
मी कुठं म्हणतो , खरं बोला ,
अहो , तुम्ही फक्त पुडी खोला |
आणि , आलीच ती जर पाशात ,
तर मग , बोला , हर हर भोला
एक मात्र , तिच्या मनाचा नसता ठाव ,
अलगद कशी ती देते हुल |
मिठी सारता बोलत पळते ,
एप्रिल फूल , एप्रिल फूल |
हे असं , आणि असंच असते ,
म्हणून तर राजे हो , जग फसते |
आता तरी काही समजून घ्या ,
ही दुनिया , दिसते तशी नसते |