माय मराठी
माय मराठी
मी कवी मराठमोळा ,
मराठीचा , मी शिलेदार |
प्रसिद्धीची हाव नको ,
नको मज , कौतुकाचा भार |
मी रसिक शब्दांचा ,
शब्दातून मांडतो ऊन कोवळे |
कधी युध्दाची ललकार ,
तर कधी मांडतो , वेदनांचे सोहळे |
कधी मी पुकारतो युद्ध ,
कधी पाहतो पिंपळात बुद्ध |
दया , क्षमा अन् शांतीचा ,
कधी मांडतो विचार शुद्ध |
मी मांडतो सत्य ठाम ,
कधी केवळ कल्पनेचा कुंचला |
अटकेपार विचार नेता ,
शब्दचि देई बळ मला |
माझी कविता मथुरेत नाही ,
नाही कदापि , ती काशीत |
संपला कुठे , वनवास हिचा ,
म्हणून तर ही , आहे अजून अप्रकाशित |
मी मराठी , महाराष्ट्र माझा ,
इथे अनेक भाषांची दाटी |
मी आसक्त होता , तोल जाता ,
जपते मला , माय मराठी |
