STORYMIRROR

Milind Sao

Others

3  

Milind Sao

Others

शिवरायांचा प्रताप

शिवरायांचा प्रताप

1 min
171

सह्याद्रीच्या कड्या कपारी 

उजळल्या शिवबाच्या धैर्याने |

रांगड्या मावळ्यांचा राजा ,

लढला मोठ्या शौर्याने |


अराजकतेने कळस गाठला ,

हाहाकार माजला चहुकडे |

जुलमी फौजा मोगलांच्या ,

रयतेचे उडवीत धिंडवडे |


धन्य ते राजे शिवछत्रपती ,

स्वराज्य हिंदवी स्थापन केले |

स्त्रीयांचा राखला सन्मान ,

सदा संतांच्या ठायी झुकले |


रांगड्या मावळ्यांना घेऊन ,

गनिमी कावा योजिला |

शत्रुंच्या उरी धडकी भरोनी ,

सह्याद्रीचा सिंह गर्जला |


मर्द मराठा शिवछत्रपती ,

शीलवान तितुका ओळखावा |

परस्त्रिआईपरिस जाणोनी ,

शत्रुनेही शिव पारखावा |


नवाज अदा करोनी ,

शिवबासाठी स्वर्ग मागिला |

कोण तो औरंग राजा ,

शिवचारित्र्यापुढेची नमला | 


झालेत बहु , होतील बहु ,

इतिहासाच्या शतको शतकी |

ऐसा राजा शिवछत्रपती ,

होणे नाही , पुन्हा त्रिलोकी !


Rate this content
Log in