डॉ. श्रीराम लागू , .....एक मराठी कलावंत !
डॉ. श्रीराम लागू , .....एक मराठी कलावंत !
1 min
238
रंगमंचावरची कठपुतलिया ,
आम्ही सारे |
राजेश खन्ना खरं बोलला ,
अरे वारे |
नटसम्राट खरा तो ,
सामना रंगवला पिंजऱ्यात |
जगला , आणि मेलाही ,
कलावंताच्या तोऱ्यात |
कलावंतांच्या मांदियाळीत ,
तीच गोतावळी घेऊन जगू |
मरणांती संदेश देत ,
गेले श्रीराम लागू |
भुमिका अनेकविध ,
नाही रुपे , नाही जाती पाती |
अशी पाखरे येती आणिक ,
स्मृती ठेवुनी जाती |
कर्मची केवळ धर्म ,
जगा अथवा मरा |
आपण व्हावे त्यांचेसम ,
बोध त्यातूनी हाच खरा |
