STORYMIRROR

Milind Sao

Others

3  

Milind Sao

Others

धुपट

धुपट

1 min
235

लय झाला धुपट ,

पेटलेल्या इचारांचा |

आग ज्यायनं लावली ,

कोणाले पत्ता त्यायचा |


     मुक्या जीवांचं पेटते रान ,

     मानसायले नाय भान |

     भयताळावाणी जो तो ,

     इकते आपलं इमान |


कोणीतरी थांबवा हे ,

धुपट खोट्या नाट्याचं |

नायतं ह्या वणव्यात ,

आपलं बी घर पेटाचं |


     आणा-भाका हिताच्या ,

     फाटक्या झोळीत ओताच्या |

     आनं माणुसकीच्या सरनावर ,

     भाकरी आपल्या शेकाच्या |


ही रित लबाड लांडग्याची ,

तुमा नाय कळायची |

आनं अज्ञानाच्या पोटी ,

अशीच आग पेटायची |


Rate this content
Log in