तु ये रे पावसा ...
तु ये रे पावसा ...
लय भेगाळली माय ,
लय भेगाळले पाय |
तु ये रे पावसा , ये ,
मन आसुसले भाय |
आभाळमाया तुही ,
का पाझरत न्हाय |
वासराच्या कडेला ,
आसू ढाळतया गाय |
दूरवर रानोमाळ ,
झाडे बहु करपली |
भिरभिरते पाखरू ,
शोधावया सावली |
लय तहानली पोरं ,
जीव वेशीवर टांगला |
वावरापाशी बाप ,
पाण्यासाठी हंबरला |
सोड ना रे हट्ट तु ,
अंत नको पाहू असा |
डोये मिटण्याआधी ,
ये , तु ये रे पावसा |
