एल्गार
एल्गार
बा माणसा
नव्हे ही बाजारगर्दी
उगाच आनंदासाठी
हा हुंकार
जनमाणसाचा
हक्कासाठी
कोण बापुडा
म्हणे एकटा मी
लेवून कपाळी माती
दे हात हाती
ही हाक आहे
ऐक्यासाठी
बेकी घडवी
स्वार्थांध सारे
माणुसकीचे वारे न्यारे
उठा गडे हो
सज्ज होऊया
युद्धासाठी
माणुसकीसाठी युद्ध
आम्ही कटिबद्ध
लढण्यासाठी
नको पै, नको पद
आम्हा द्या अस्मिता
जगण्यासाठी
का भेदभाव
बंधुता आमचा स्थायीभाव
बंड अमुचे समतेसाठी
हक्क अमुचे ध्येय
लढुया आम्ही
ध्येयासाठी
