STORYMIRROR

Milind Sao

Inspirational

3  

Milind Sao

Inspirational

विज्ञानाचे दारी !

विज्ञानाचे दारी !

1 min
259

श्रध्देचा खेळ ,

मांडती भामटे बाजारी ,

पसरला देव्हारी ,

पाखंड !


दगडाचा देव ,

त्याला शेंदराची रंगोटी ,

भाविकांची दाटी ,

अंध !


ढोंगी बगळे ,

आचरती दृष्ट निती ,

नित्य सांगती ,

कर्मकांड !


पाऊले चालती ,

कशी चुकलेली वाट ,

ज्ञानाची पहाट ,

दूर !


ओळखावा देव ,

दीन दुबळ्याच्या झोपडीत ,

जिथे व्यथित ,

केविलवाणे !


देव म्हणजे ,

दया , क्षमा , शांती ,

जाणावे अनुभवाअंती ,

लोकहो !


कळो अज्ञानासी ,

सत्य विज्ञानाचे दारी ,

खेळ अघोरी ,

टळो !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational