Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gaurav Daware

Comedy

4.0  

Gaurav Daware

Comedy

माय स्वातंत्र्य

माय स्वातंत्र्य

1 min
269


आज झालं वय 21 खरं 

म्हणबन गेलो दादाकडं

म्हटलं मले लग्न करायचं हाय 

तू मुलगी आजच पाय....


दादानं हाणली एक गालात 

म्हणे "आधी माय मग तुयी वरात 

लेका मी म्यासाठी पोट्टी पाहून ठेवली 

अन तू तुयी मधातच घुसवली"..... 


असं कसं हे माझं स्वातंत्र्य !!


मग गेलो बापाकडं 

म्हटलं वय माय झालं बरं

पाऊ पोरगी अन उरकवू माय 

म्हणजे एक वर्षात पाळणा हल-तोय..... 

 

बापानं दिली एक थूतकारीत 

म्हणे आधी अभ्यास मग लागू तयारीत 

नशीबच माय फुटकं निघालं 

लग्नाची इच्छा मनातच राहालं....


असं कसं हे माझं स्वातंत्र्य !!


मग गेलो आईकडं

म्हटलं तू एवढं काम करते हे बरं न्हवं

तुझ्यासाठी एक सून आणायची 

वेळ बहुतेक आता माझीच झाली..... 


आई आता थोडीशी हसली 

हातात झाडू घेऊन मायाजवळ बसली 

म्या पळालो लागलो तुरु तुरु 

अन आईनं झोडपलं मले धरू धरू.......


कसं कसं हे माझं स्वातंत्र्य!!


आता आला मले भयानक राग 

सगळे होते एकच खोलीत अन एकच आवारात 

सगळ्याकडं म्या पहात होतो 

म्या त्यांले म्हटलं इनकलाब झिंदाबाद अन भारत छोडो... 


माया सोबत आता अजबच घडलं 

म्या म्हटलं भारत छोडो म्हणून मलेच घराबाहेर काढलं

घराबाहेर होतो म्या दोन दिवस 

लयी होता तरास नव्हतं आता सरत..... 


काही दिवसांन घरासमोर 

राहिले आली एक पोट्टी 

मस्त होती दिसत जशी 

पहिली प्रेमाची चिट्ठी..... 


म्या तिले वय विचारलं 

तर आहे म्हणे सतरा 

म्या म्हटलं पुढल्या वर्षी होते तुले अठरा 

मग करू घरासमोर लग्नाचा खतरा खतरा खतरा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy