चावी
चावी
किती बरं झालं असतं
बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती
रोजच्या कटकटीतून मुक्तता मिळाली असती
रोजचीच कटकट, रोजचीच मरमर, कमी झाली असती
किती बरं झालं असतं
बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती
हवी तेव्हा बंद; हवी तेव्हा चालू; करता आली असती
दुःखाचे दिवस वजा करून सुखाच्या दिवसांची बेरीज करता आली असती
रोजच्या त्याचत्याच कटकटीतून, मुक्तता मिळाली असती
रोजचाच रुसवा रोजचाच फुगवा कमी झाला असता.
माझंच खरं करण्याचा ठेका गेला असता.
किती बरं झालं असतं
बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती
हवी तेव्हा बंद ; हवी तेव्हा चालू ; करता आली असती
थोड्याश्या कारणावरून रुसून बसली नसती
छोट्याश्या भांडणावरून माहेरी गेली नसती
कधीच तिने नवऱ्याला धमकी दिली नसती
किती बरं झालं असतं
बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती
सर्वच दिवस आनंदात, न्हाऊन गेले असते
जीवनात नवऱ्यांच्या सदैव, खुशाली आली असती
आपला दिवस म्हणून जगण्याची, मुभा मिळाली असती
प्रत्येक नियोजनात आडकाठी घालण्यापासून, सुटका मिळाली असती
किती बरं झालं असतं
बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती
खरंच "अभिमानानं" नवरा म्हणून जगण्याची, वेळ तरी आली असती.
