दवांकूर
दवांकूर
1 min
137
दाट धुक्यातील थंड वाऱ्याने
तृणपात्यावर दवबिंदू सोडले
सूर्याच्या कोवळ्या किरणांनी
दवबिंदू ते प्रकाशमय झाले
अलगद पडता पाऊल त्यावरी
दवबिंदूचे त्या झाले पाणी
त्या पाण्यातूनी पुन्हा एकदा
निसर्गातील हिरवळ नटली
पुन्हा झेलाया दवबिंदूचे मोती
