होळी
होळी
1 min
137
फाल्गुन महीन्याच्या पोर्णिमेला
सण हा होळीचा आला
वाईट सारे जळून जावे
चांगले ते उदयास यावे
होळीच्या अग्नित दहन व्हावे वादाचे
पुजावे श्रीफळ नवसंवादाचे
वाईट गुणांची करूनी होळी
सद्गुणांची जोत पेटवावी
सकारात्मकतेच्या नवचैतन्याने
विचारांना नवी झळाळी मिळावी
अपप्रवृत्तीनां नष्ट करत
नवविचारांची होळी साजरी व्हावी
जुने जे जे वाईट ते सोडूनी
नाविंन्याचे स्वागत करावे
होळीच्या अग्निमध्ये आज
असत्य, अहंकार, नकारात्मकतेचे दहन व्हावे
