परी सीमा
परी सीमा
अर्थ प्रेमाचा कधी कळलाच नाही
जोपर्यंत तु आयुष्यात आलीच नाहीस
जेव्हा आलीस आयुष्यात माझ्या तेव्हा
प्रेमाची परी "सीमा" समजावून गेलीस
जशा अथांग सागराच्या "सीमा"
डोळ्याने सहज दिसत नाहीत
तशी प्रेमाची परीभाषा तुझ्या
क्षणात समजत उमजत नाही
तु आलीस आयुष्यात माझ्या
तोच माझा व्हॅलेंटाईन डे होता
तो दीवस माझ्या आयुष्यातील
सुवर्णमयी तेजोमय क्षण होता
आज मी सखे पुन्हा म्हणतोय
सांग माझी व्हॅलेंटाईन होशील का ?
आयुष्यभर सखे तु माझ्यावर
असचं प्रेम करशील का ?

