STORYMIRROR

siddheshwar patankar

Comedy Romance

3  

siddheshwar patankar

Comedy Romance

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब

1 min
447

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब

ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

आधीच फिल्डिंग लागली होती

पण कॅच मी केला


कित्येकांनी हाय खाल्ली

बऱ्याच जणांनी माघार घेतली

सर्वांदेखत चाटून पार फस्त केला

गड्या, मी पहिला टप्पा पार केला


दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो

मैत्रिणींच्या कळपात आलो

दोन फारच जिवलग होत्या, तिच्या

नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो


बघता बघता सेमीला गेलो

सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी

नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी


एकुलती एक बहीण होती त्यांची

शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा

सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो

जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा

अन अंतिम फेरीत दाखल झालो

सर्व सैन्य आधीच झाले होते फितूर


तरी विश्वास नव्हता,

कारण तिचा बाप होता मोठा चतुर

सर्व बोलणी व्यवस्थित पार पडली

अचानक कुठेतरी एक माशी शिंकली

माझीच जुनी प्रेयसी, तिची चुलत बहीण निघाली


बापासमोरच माझी कुंडली मांडली

जुन्या आठवणींनी आकाशपाताळ एक केले

अंतिम फेरीत सैन्य पलटले

शिव्याश्राप देऊन भरपूर बुकलले

कप गेला मसनात, माझेच कंबरडे मोडले

पुरे पुरे म्हणून हंबरडे फोडले

डोळ्यासमोर साक्षात यमदेव आले

कसं सांगू गड्या , या मॅचने माझे कायमचे पारणे फिटले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy