STORYMIRROR

siddheshwar patankar

Others

4  

siddheshwar patankar

Others

पहिला कश

पहिला कश

1 min
493

मला आठवतंय अजूनही सारं 

तो रिमझिमणारा पाऊस अन ते थंडगार वारं 

तसा होतो मी फक्त चहाचा शौकीन 

वातावरणाचा आनंद घ्यायचो 

कटिंगवर मारायचो कटिंग 


बघायचो मित्रांना तिला सोबत घेऊन बसलेलं 

त्यांच्या ओठाशी खेळून खेळून हवेत मिसळलेलं  

मित्र सारे मारत बसायचे झुरके 

माझे चालूच असायचे चहाचे भुरक्यावर भुर्के 


एका रमणीय दिवशी होती मित्राची एकवीशी 

पार्टी रंगात होती ती इथून तिथे फिरत होती 

पटकन आली ओठाशी 

नकाराचा प्रश्नच नव्हता, ना कुठली ओढ तशी 

मारला एक जोरदार कश, मित्रा 

ओढली तिला थेट हृदयाशी 


ती निर्विकारपणे आत गेली 

बरंच काही करून बाहेर आली 

येत राहिली, येत राहिली 

कधी तोंडातून कधी नाकातून 

मैत्रीची पावती देत राहिली 


मन मस्त हलकं झालं 

निर्मळ मैत्री आणि निर्मळ मैत्रीण 

जी आधी होते पंचतत्वात विलीन 

नंतर हळूहळू तिची साथ देणाऱ्यालाही करते विलीन 

तो पहिला कश, म्हणतात ज्याला सुट्टा 


तो सुटता सुटता राहिला 

आधी तोंड लपवून प्यायचो 

आता गल्लीतला पानवालापण ओळखायला लागला 

खंगलोय, खोकतोय तरी ठोकतोय एकावर एक 

आई, जिला अवस्था बघून काहीच सुचत नाही 

बाप शिव्या देऊन देऊन थकत नाही 


मित्रा, भरपूर प्रयत्न करतोय, लेका सोडण्याचा 

पण ही सिगरेट काही सुटत नाही 

इच्छा माणसाला मारू शकते कधीही 

पण माणूस इच्छेला मारू शकत नाही 

जो नादाला लागला 

त्याला कोणच सुधारू शकत नाही


Rate this content
Log in