STORYMIRROR

Shila Ambhure

Comedy

3  

Shila Ambhure

Comedy

हसरे तारे

हसरे तारे

1 min
14K


घरात माझिया

हसतात तारे

मिळुनि करती

दंगामस्ती सारे।।धृ।।


मजेदार किती

तयांचे ते खेळ

जातो निघुनिया

भरकन वेळ

खेळुनि दमुनि

झोपतात सारे।।1।।


लुटुपुटुची ती

भारीच लढाई

सैनिक होऊनि

करिती चढाई

अंगात भिनते

शुरतेचे वारे।।2।।


घर माझे जणू

निळे नभांगन

बालचमु भासे

छोटे तारांगण

बघुनी तयांना

आनंद झाला रे।।3।।


भविष्य उद्याचे

आजची ही मुले

शोभतात जशी

बागेतली फुले

हळुवारपणे

फुलवू त्यांना रे।।4।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy