STORYMIRROR

Prashant Shinde

Comedy

3  

Prashant Shinde

Comedy

कुलूप

कुलूप

1 min
178


असून खास मालक घरचा

असा आज घोळ झाला

किल्लीसाठी पहा कसा

बाहेरच मुकाट थांबला...


गडबडीत बाहेर पडता

किल्लीचा विसर पडला

नको नको तो ताप

डोक्याशी आपोआप झाला...


पावसाची रिपरिप

त्यात किचकिच होय भारी

डोकावूनी पहाता जरा

गायबही झाला होता शेजारी...


कुलपेच नुसती लटकती

टकमक मज पहात होती

कीव करावी वाटली मज

त्या लटकत्या कुलपांची....


द्वाड ती कुलपेदेखील

पाहुनी मज हसत होती

काय रे बाबा फिरली का मती

म्हणुनी जणू पुसत मज होती...


म्हटले मनातच त्यांना

आज वार आहे रे लेको तुमचा

थांबतो मुकाट दारातच आता

हा राहू काळच असावा आमचा...


वाटले क्षणभर मज

झाले ते बरेच की झाले

निदान आजतरी कुलपासी

थोडे हितगुज करता आले...


कळले किल्लीचे मोल मजला

दारात तिष्ठत काव्य लिहिताना

म्हटले कधीच विसरणार नाही

पुन्हा किल्लीस बाहेर जाताना....!

दारातली शुभ सायंकाळ...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy