भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी
भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी
भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी
एके दिवशी बागेमध्ये
दुरूनच ती न्याहाळत होती
लगडलेली हिरवी केळी
मी रममाण नामस्मरणी
बैसलों टेकूनी बाकाला
अंतःपुरातून इशारा येता
डावा डोळा फडफडला
तिने माळलेला मोगरा मजला
बरेच काही सांगुनी गेला
गत आठवणींचे बाष्प जमुनी
चष्मा थोडा ओला झाला
काचा झाल्या धूसर धूसर
नाद लागले खुळचट
विस्मरण ते हरीनामाचे
देठ पुन्हा तो हिरवट
वायपर लावूनी साफ केली
आठवण सारी काचेवरची
ओळखलंस का मला म्हणुनी
थेट बैसलों बाजूला
हात टाकुनी खांद्यावरती
जवळ घेतले मी तिजला
नजरेसाठी आसुसलेलो
झालो होतो आतुर
काठी घेऊनि हाणहाणले
फोडलं माझं टकूर
हरी हरी ते पुन्हा आठवले
मसनात गेले देठ सारे
नको पुन्हा त्या कटू आठवणी
सांगुनी गेले मज म्हातारे
