STORYMIRROR

Pandit Warade

Comedy

4.5  

Pandit Warade

Comedy

पिंपळाखालचा गणा

पिंपळाखालचा गणा

1 min
14K


ऐका हो ऐका तुम्ही ध्यान देऊन ऐका।

गण्याची गमतीदार गोष्ट तुम्ही ऐका।।


एक होता गणा त्याचं पिंपळाखाली घर।

झाडाच्या खोडा भोवती घातला होता पार।।


गणा होता लहान नेमका चालू बोलू लागला।

साऱ्यांना आवडू लागे त्याच्या बाल लीला।।


सरकारी अधिकारी जेव्हा गावामध्ये यायचे।

गावाच्या कामासाठी सारे पारावर बसायचे।।


महसूल वसुलीसाठी घोड्यावरून यायचे।

वसुलीचे काम झाले की घोड्यावर जायचे।।


गण्याचा बाप घोड्यावर तालुक्याला गेला।

गण्याही हट्टाने त्याच्या मागोमाग चालला।।


गण्या मागे आला नव्हते माहीत बापाला।

सर्वांनाच वाटले गण्या बापासोबत गेला ।।


गण्या चालत चालत झाडाखाली आला।

थकून भुकेला गण्या झाडाखाली थांबला।।


झाड होते पिंपळाचे गण्या तिथंच बसला।

काम आटोपून अधिकारी घोड्यावर आला।।


संध्याकाळ अंधारलेली दूरवर कुणी नाही।

बाळ कुणाचं रडतय काहीच कळत नाही।।


अधिकारी एकटाच होता घाबरला जाम।

थंडीतही त्याला कसा होता फुटला घाम।।


धीर करून त्याने नाव त्याला विचारलं।

'पिंपळाखालचा गणा' गण्यानं सांगितलं।।


गण्याचे उत्तर ऐकून अधिकारी घाबरला।

घोड्या वरून पडून तो बेशुद्धच झाला।।


गण्याचा बाप जेव्हा तालुक्याहून आला।

गण्या अन् साहेबाला तिथे पाहून थांबला।।


तोंडावर पाणी मारून साहेब शुद्धीत आला।

गण्याच्या बापाने साराच खुलासा केला।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy