कुंभमेळा क्रिकेटचा
कुंभमेळा क्रिकेटचा
कुंभमेळा, क्रिकेटचा, खेळ तो वर्ल्डकपचा!
देणगी ब्रिटीशांची, अन मांडलिक देशांचा!!1
एका धावेवर इथे,सट्टा लागतो बाजारी!
आहे,रोमांच, खुपही,पाहती बसूनी सारी!!2
पाक भारत युध्द जणु,असा सामना होतो!
आपला देश जिंकावा, हट्ट दोघांचा असतो!!3
आँस्ट्रोलिया,इंग्लडची, आहे खुन्नस ती फार!
कधी हे भारी, कधी ते, त्यांच्यात चुरस फार!!4
वेस्ट इंडीज दरारा, आहे पहिल्या पासूनी!
पण त्यांना ही हरविले, आपल्या स्पिनर्सनी!!5
गावस्कर,विश्वनाथ, विजयांचे शिल्पकार!
विश्वचषकाचे स्वप्न, करी कपील साकार!!4
गांगुली,सचिनची बँटींग कोण विसरेल!
गोलंदाजांची, कमाल, जो तो लक्षात ठेवेल!!5
धोनी सचीन विराटची, बँटींग ती धमाल!
मैदानावरी, खेळाडुंच्या , कौशल्यांची कमाल !!6
कर्णधारांचे डावपेच,खिलाडु वृत्ती छान!
चाहत्यांना असते, आपल्या देशाचेच भान!!7
धोनी आल्यानंतर ,महत्व आपले वाढले!
आयपीएलच्या सरावाने,चषक जिंकले!!8
कामधाम, विसरूनी, टिव्ही जवळ बसती!
जेव्हा मँच भारताची,खाणेपिणे ना सुचती!!9
हाती झेंडे मिरवुनी, शह प्रति आव्हानांची!
स्टेडियम शौकिनांनी,भरगच्च उत्पन्नांची!!10
आहे क्रिकेटची मक्का, ते लाँर्डसचे मैदान!
झाले बहु,होतील, खेळाडु घडती महान!!11
