वाढदिवस ससूलीचा
वाढदिवस ससूलीचा
गम्मत जम्मत गोष्टी गाणी
करण्या जमले सगळे प्राणी,
कारण होत वाढदिवसाचं
त्यांच्या आवडत्या राणीचं
ससूली राणी गोंडस त्यांची
झाली आज ती वर्षाची ,
नटून सजून बाहेर आली
केक कापण्या सज्ज झाली
गुलाबी गुलाबी फ्रॉक सुंदर
फुले शोभती छानच त्यावर,
गुलाबी गुलाबी सॉक्स छोटे
नेल पॉलीश ने रंगली बोटे
डोक्या वरती मुकुट हिऱ्याचा
चम चम करतो सुंदर साजा,
अंगठीचाही हिरा चमकतो
पायी पैंजण रुणझुण करतो
केक कापला चालू दावत
प्राणी सगळे आले धावत,
पोटभर मग खाल्ला खाऊ
गिफ्ट द्यावया लागले जाऊ
पाहुण्यांची लागली नुसती रीघ
भेटींचा पण जमला ढीग,
सासुलीचा दिवस आनंदात गेला
वाढदिवस खूप छान झाला
