आला ऋतू हिवाळ्याचा
आला ऋतू हिवाळ्याचा
आला ऋतू हिवाळ्याचा,
सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा.
ना काहिली उन्हाची
ना रिपरिप पावसाची.
रजई पांघरलेली शहराकडली सकाळ,
वाफाळलेल्या कॉफीची सुगंधीत संध्याकाळ.
खिडकीतून दिसणारा भुरभुरणारा बर्फ,
हिवाळ्याच्या पानगळीचा अनोखा दर्प.
उबदार शेकोटीची गम्मत न्यारी,
शेकोटी भोवती च्या गोष्टीच भारी.
गावाकडली पहाट धुक्यात भिजली,
कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र निजली.
हिवाळा म्हणजे खमंग हुरड्याची पार्टी,
गरमा गरम कणसं ,मीठ मसाला वरती.
बाजरीची भाकरी वर तुपाची धार,
हिवाळ्यात भूक पण लागते फार.
हिवाळा ऋतू थंडथंड गार,
वातावरण असते उत्साही फार.
नेहेमीचाच झालाय उन्हाळा पावसाळा ,
आगळा वेगळा असतो हिवाळा.
