अंड्याचा पोळा
अंड्याचा पोळा
छोटस अंड फ्रीज मधून पडलं,
गड गड करत धावत सुटलं.
मध्येच भेटली मिरची बाई,
तिला कामाची सतत घाई.
टोपलीतून उतरले कांदेभाऊ,
म्हणाले जरा झोपून घेऊ.
मीठ दादा डबीतून डोकावले,
ताटली मध्ये पडून राहिले.
आजीने केलं सगळ्यांना गोळा,
अंड्याचा मस्त बनवला पोळा.
गरमा गरम बाळाला दिला,
बाळाने पटकन गट्टम केला.
खाऊन अंड्याचा खरपूस पोळा,
बाळ मस्त झोपून गेला.
