आली दिवाळी
आली दिवाळी
आली जवळी दिवाळी,
उत्साह वाढे मनोमनी
पणत्या फराळ, कंदील रांगोळी
लगबग सुरु ,झाली घरोघरी
गाई वासराची पूजा, करू वसुबारसेला
गोडा धोडाची तयारी ,त्यांच्या मुखी लावायला
धनत्रयोदशीला पूजा, कुबेराची करू,
नरकचतुर्दशीला चला, कारिट हे फोडू
पती पत्नीच्या स्नेहाचा, करी साजरा गोडवा,
नवा आनंद घेऊन, आला दिवाळी पाडवा
आणि जवळ नात्यानं, अशी असते दिवाळी
भाऊबीजेच्या दिवशी, बहीण भावाला ओवाळी
दिव्या दिव्याची आरास, आणि फराळाची रास
सण दिवाळी करते, सुखाचीच बरसात
